सेटलमेंट सायकल

 

इक्विटी मार्केटमध्ये शेअर्सची सेटलमेंट कशी होते?

 

आपल्या देशामध्ये T+2 सेटलमेंट पद्धत अस्तित्वात आहे.

 

म्हणजे समजा तुम्ही आज काही शेअर्स खरेदी केलेत, तर ते शेअर्स तुमच्या डीमॅट अकाऊंटमध्ये येण्यासाठी दोन दिवसांचा वेळ लागतो.

तसेच तुम्ही आज शेअर्स विकलेत, तर ते शेअर्स पुढील दोन दिवसांमध्ये तुमच्या डीमॅट अकाऊंटमधुन वजा होतात आणि त्या विक्रीचे पैसे दोन दिवसांनी तुमच्या ट्रेडिंग अकाऊंटमध्ये जमा होतात.

 

याचाच अर्थ तुम्ही समजा आज शेअर्स खरेदी केले असतील तर ते शेअर्स टेक्निकली तुम्ही लगेच उद्या विकु शकत नाही.

 

परंतु बरेच ट्रेडर्स BTST (बाय टुडे सेल टुमारो) ट्रॅंझॅक्शन्स करीत असतात.

 

अश्या पद्धतीच्या BTST ट्रॅंझॅक्शन्समध्ये डीफॉल्ट रिस्क असते.

 

म्हणजे समजा तुम्ही आज शेअर्स खरेदी केले, आणि उद्या लगेच ते विकले, परंतु T+2 सेटलमेंटच्या दिवशी म्हणजे परवा समजा तुमच्या खात्यामध्ये शेअर्स आलेच नाहीत (समजा तुम्हाला शेअर्स विकणार्‍या व्यक्तीने शेअर्स दिले नाहीत) तर तुम्हीसुद्धा दुसर्‍या दिवशी जे शेअर्स विकले आहेत त्याची डिलिव्हरी देऊ शकणार नाही आणि तुमचासुद्धा डीफॉल्ट होईल.

 

अश्या परिस्थितीमध्ये तुम्हाला मोठी पेनल्टी लागु शकते. त्यामुळे BTST ट्रेडिंग शक्यतो टाळावे. हल्ली POA असल्यामुळे डीफॉल्ट होण्याचे प्रमाण जरी नगण्य असले तरीसुद्धा आपण शक्यतो BTST ट्रेडिंग करु नये.

 

अजुन एक कॉमन प्रश्न लोकांच्या मनामध्ये असतो तो म्हणजे-

 

समजा मी डिलिव्हरी घेण्यासाठी आज CNC ऑप्शन वापरुन शेअर्स खरेदी केले, पण आजच त्याचा भाव वाढला आणि आजच मला ते विकायचे असतील तर?

 

तुम्ही आजच्या आज तुमचे शेअर्स विकु शकता. विकताना तुम्हाला CNC हाच ऑप्शन निवडावा लागेल (कारण खरेदी करतानासुद्धा तुम्ही CNC ऑप्शन निवडलेला होता)

 

हा ट्रेड "इंट्राडे ट्रेड" समजला जाईल आणि या ट्रेडला इंट्राडे चे चार्जेस लावले जातील.

झिरोधामध्ये डीमॅट अकाऊंट उघडण्यासाठी येथे क्लिक करा

 

एडलवाईजमध्ये डीमॅट अकाऊंट उघडण्यासाठी येथे क्लिक करा

 

पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनमध्ये अ‍ॅडमिशन घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

RTSS मध्ये अ‍ॅडमिशन घेण्यासाठी येथे क्लिक करा