"पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन" सपोर्ट सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे. खाली दिलेल्या गोष्टी लक्षपूर्वक बघा.

"पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन"मध्ये लॉगिन कसे करावे?


तुमचे पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला आमच्याकडुन ईमेल आणि SMS वर तुमचे लॉगिन डीटेल्स पाठवले जातात. तुम्ही पेमेंटच्या वेळी तुमचा जो ईमेल आयडी रजिस्टर केला आहे तो तुमचा जर आयडी असतो आणि तुम्ही पेमेंटच्या वेळी जो पासवर्ड सेट केलेला असतो तो तुमचा पासवर्ड असतो. लॉगिन करण्यासाठीची वेब लिंक- https://www.guntavnook.com या लिंकवर या आणि "कोर्सेसमध्ये लॉगिन करा" या पिवळ्या बटणवर क्लिक करा. आता तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकुन लॉगिन करा पासवर्ड रिसेट करण्यासाठी लिंक- https://marathimarket.in/password




पेमेंट केल्यावर लॉगिन डीटेल्स मिळाले नसल्यास काय करावे?


तुमचे पेमेंट प्रोसेस झाल्यावर लगेच आमच्या सिस्टीमकडुन तुम्हाला ईमेल पाठवला जातो. तुमच्या ईमेलमधील SPAM आणि PROMOTIONS नावाचे फोल्डर्स नीट बघा. ईमेल कधीकधी तिथे जाऊ शकते. पेमेंट करताना जर तुम्ही चुकीचा ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर दिला असेल तर ईमेल मिळणार नाही. असे झाल्यास काळजी करु नका. असे असल्यास आम्हाला connect@guntavnook.com येथे एक ईमेल करा. पुढील 24 तासात आमची टीम तुमचा ईमेल आयडी दुरुस्त करुन देईल.




लॉगिन केल्यानंतर पुढे काय करावे?


पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनच्या माध्यमातुन तुम्हाला पुढील काही काळात शेअर मार्केटचे ज्ञान मिळवायचे आहे, तसेच स्वतःसाठी मोठा पोर्टफोलिओ तयार करायचा आहे. हे करण्याकरिता तुम्हाला या प्लॅनमध्ये दररोज / सतत लॉगिन करत राहणे गरजेचे आहे. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला आपले सर्व कोर्सेस दिसु लागतात. हे सर्व कोर्सेस तुम्ही ओळीने बघुन पूर्ण करणे तसेच, या कोर्सेसमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अवलंब करणे अपेक्षित आहे.




PBP टेलिग्राम चॅनल काय आहे?


टेलिग्राम (Telegram) हे व्हॉट्सअ‍ॅपसारखेच एक अ‍ॅप आहे. पण यामध्ये व्हॉट्सअ‍ॅपपेक्षा जास्त सुविधा आहेत. या अ‍ॅपवर PBP मेंबर्सना अपडेट्स देण्यासाठी एक प्रायव्हेट चॅनल तयार केलेला आहे. PBP प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा (कोर्समध्ये लॉगिन असणे आवश्यक) ( टेलिग्राम App इन्स्टॉल केलेले असणे आवश्यक)