"गुंतवणूक कट्टा" सपोर्ट सेंटर
POA पॉवर ऑफ अॅटर्नी म्हणजे काय?
आपण जेव्हा शेअर ट्रेडिंगसाठी अकाऊंट उघडतो, तेव्हा आपली दोन अकाऊंट्स उघडली जातात.
1- ट्रेडिंग अकाऊंट- हे अकाऊंट शेअर्स खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी असते.
2- डीमॅट अकाऊंट- हे अकाऊंट खरेदी केलेले शेअर्स साठवुन ठेवण्यासाठी असते.
डीमॅट अकाऊंट हे आपल्या ब्रोकरच्या मार्फत डिपॉझिटरीकडे उघडले जाते.
(भारतामध्ये CDSL आणि NSDL या दोन डिपॉझिटरी आहेत.)
याचाच अर्थ आपले सर्व शेअर्स हे डिपॉझिटरी अकाऊंटमध्ये ठेवलेले असतात.
जेव्हा आपण आपल्या ट्रेडिंग अकाऊंटमधुन शेअर्स विकतो, तेव्हा आपल्याला आपले शेअर्स खरेदी करणार्याला द्यावे लागतात.
आपले शेअर्स तर डिपॉझिटरीकडे आहेत.
मग आपण शेअर्स विकले आहेत ही गोष्ट डिपॉझिटरीला समजण्यासाठी ब्रोकर्स आपल्याकडुन POA सही करुन मागतात.
ही POA अकाऊंट उघडताना एकदाच जर आपण सही करुन दिली तर पुढे कायम जेव्हा आपण शेअर्स विकु तेव्हा डिपॉझिटरीला आपोआप कळवली जाते.
POA सही करुन देण्याआधी नीट वाचुन घ्यावी.
POA ही एक अधिकृत प्रोसेस आहे.
POA देणे मॅंडेटरी नाही.
तुम्ही जर POA सही करुन दिली नाही, तर दर वेळी शेअर्स विकताना तुम्हाला मॅन्युअली डिपॉझिटरीला तसे सांगावे लागते. आणि दरवेळी हे थोडेसे त्रासदायक ठरु शकते.
त्यामुळे POA दिलेली चांगली मानली जाते.
समजा तुम्ही POA सही करुन दिली नसेल, तर तुमच्या रिलेशनशिप मॅनेजरकडे मॅन्युअल अॅप्रूव्हलची काय पद्धत आहे याची विचारणा करावी.