top of page

मार्जिन म्हणजे काय?

मार्जिन म्हणजे काय हे समजण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला शेअर बाजाराची कार्यपद्धती समजुन घ्यावी लागेल.

 

तुम्ही जेव्हा एखादा शेअर खरेदी करता, तेव्हा तांत्रिकदृष्ट्या त्याचे पैसे तुम्ही शेअर खरेदी केल्यानंतर दोन दिवसांमध्ये कधीही देऊ शकता. कारण आपल्याकडे T+2 सेटलमेंट पद्धत अस्तित्वात आहे.

 

आता एक उदाहरण बघुयात.

 

समजा तुम्ही तुमच्या ब्रोकरला आज सकाळी अशी ऑर्डर दिली की माझ्या अकाऊंटमध्ये XYZ कंपनीचे 100 शेअर्स 10 रुपये या भावाने खरेदी कर.

 

तुमच्या ब्रोकरने समजा हे शेअर्स खरेदी केले. पण तुम्ही या शेअर्सचे पैसे दोन दिवसात दिलेच नाहीत तर?

 

यामध्ये ब्रोकर आणि एक्स्चेंजला नुकसान सहन करावे लागेल.

 

म्हणुन तुमचा ब्रोकर तुमच्याकडुन या खरेदीसाठी मार्जिन रक्कम मागतो.

 

म्हणजेच तुमच्या अकाऊंटमध्ये मार्जिन रक्कम असल्याशिवाय खरेदीचा व्यवहार पूर्ण होऊच शकत नाही.

 

इक्विटी मार्केटमध्ये VAR मार्जिन (व्हॅल्यु अ‍ॅट रिस्क) मार्जिन घेण्याचा नियम आहे.

 

म्हणजेच प्रत्येक शेअरच्या व्होलटॅलिटीनुसार मार्जिनचे दर निश्चित केलेले आहेत.

 

100 रुपयांचे शेअर्स खरेदी करण्याकरिता तुमच्या खात्यामध्ये सुमारे 15 रुपये इतके मार्जिन असणे आवश्यक आहे.

 

समजा तुम्ही आज शेअर्स खरेदी केले आणि आजच विकले, तर हा तुमचा ट्रेड फक्त मार्जिनवरच पूर्ण होईल कारण हा इंट्राडे ट्रेड असेल.

 

समजा तुम्ही शेअरची डिलिव्हरी घेतली तर पहिल्यांदा तुमच्या अकाऊंटमध्ये मार्जिन डेबिट होईल. संध्याकाळी बिलिंग झाले की शेअरची पूर्ण रक्कम तुमच्या अकाऊंटला डेबिट होईल आणि मार्जिन अमाऊंट पुन्हा क्रेडिट होईल.

 

पूर्वी स्टॉक ब्रोकर्स क्लायंटकडुन अतिशय कमी मार्जिन घेत असत आणि त्याबदल्यात त्याला जास्त रकमेचे ट्रेडिंग करण्याची परवानगी देत असत.

 

परंतु यामुळे ओव्हरट्रेडिंग होऊ लागले आणि लोकांचे नुकसान होऊ लागले.

 

म्हणुन आता सेबीने विवक्षित मार्जिन रक्कम घेणे बंधनकारक केलेले आहे. (यालाच Peak Margin असे म्हणतात)

 

कोणत्या शेअरसाठी किती मार्जिन लागेल याची माहिती पुढील लिंक्सवर बघायला मिळेल

 

झिरोधा

 

एडलवाईज

या मार्जिन पद्धतीमुळे तुम्ही कमी रकमेमध्ये जास्त रकमेचे शेअर्स इंट्राडेसाठी ट्रेड करु शकता.

 

समजा तुमच्या खात्यामध्ये 15 ते 20 रुपये असतील तर तुम्ही 100 रुपयांचे इंट्राडे व्यवहार करु शकता.

 

यामुळे जरी तुमची फायदा होण्याची शक्यता वाढत असली तरी रिस्कदेखील तितकीच वाढते. तेव्हा मार्जिन ट्रेडिंग जपुन करावे.

 

झिरोधामध्ये अकाऊंट उघडण्यासाठी येथे क्लिक करा

 

एडलवाईजमध्ये अकाऊंट उघडण्यासाठी येथे क्लिक करा

सोप्या मराठी भाषेमधुन शेअर मार्केट शिकण्यासाठी पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन जॉईन करा

एडलवाईज ब्रोकरच्या मार्जिन फाईल्स बघण्यासाठी तुमच्या एडलवाईज अकाऊंटमध्ये लॉगिन करा. तुम्ही जेव्हा बाय किंवा सेलची ऑर्डर टाकता तिथेच तुम्हाला मार्जिन फाईल्स नावाचा ऑप्शन दिसेल

bottom of page