top of page

स्टॉप लॉस म्हणजे काय?

 

समजा तुम्हाला असे वाटत असेल, की एखादा शेअर वर जाण्याची शक्यता आहे, तेव्हा तुम्ही तो शेअर खरेदी करता.

 

समजा तुम्ही हा शेअर खरेदी केला, पण या शेअरची किंमत तुमच्या अंदाजानुसार जर वर न जाता खाली येऊ लागली तर तुम्हाला लॉस होऊ लागतो.

 

हा लॉस थांबवण्यासाठी "स्टॉप लॉस" चा वापर केला जातो.

 

एक उदाहरण घेऊन समजुन घेउयात.

 

समजा XYZ Ltd. या शेअरची सध्याची किंमत 100/- रुपये आहे.

 

तुमचा असा अंदाज आहे की ही किंमत वर जाऊ शकते.

 

म्हणुन तुम्ही 100/- रुपयांना हा शेअर खरेदी करता.

 

तुमची अपेक्षा अशी आहे की या शेअरची किंमत 110/- रुपये होईल.

 

परंतु तुम्ही खरेदी केल्यानंतर शेअरची किंमत वर न जाता खाली उतरु लागली तर तुमच्या अकाऊंटमध्ये लॉस दिसु लागेल.

 

ही किंमत किती खाली जाऊ शकेल याला काही लिमिट नसते.

 

त्यामुळे तुम्ही 95/- रुपये हे तुमची स्टॉप लॉस लिमिट निश्चित करता.

 

म्हणजेच 95/- रुपये किंमत आल्यावर तुमचे शेअर्स लॉसमध्ये विकुन टाकता आणि तुमचा लॉस "स्टॉप" करता.

 

यालाच "स्टॉप लॉस" असे म्हणले जाते.

 

इंट्राडे ट्रेडिंग करताना आपण बरेचदा "शॉर्ट सेलिंग"सुद्धा करतो. शॉर्ट सेलिंग म्हणजेच आधी शेअर विकणे आणि मार्केट बंद होण्या अगोदर ते शेअर्स पुन्हा खरेदी करणे.

 

यामध्ये देखील स्टॉप लॉसचा वापर केला पाहिजे.

 

समजा एखादा शेअर सध्या 100/- रुपयांवर ट्रेड करीत आहे. तुम्हाला असे वाटत आहे, की आज मार्केट बंद होण्यापूर्वी हा शेअर खाली पडु शकतो आण्नि 90/- रुपयांवर येऊ शकतो, तर तुम्ही तो शेअर आधी विकुन टाकता.

 

अश्या परिस्थितीमध्ये समजा तुमचा अंदाज चुकला आणि शेअर खाली न येता वर वर जाऊ लागला तर तुम्ही 105/- रुपयांवर स्टॉप लॉस लावुन त्या शेअरमध्ये बाहेर पडता.


स्टॉप लॉस कसा लावावा?

 

समजा तुम्ही इंट्राडे साठी स्टॉक खरेदी करीत असाल तर-

 

1- पहिले आपली खरेदीची ऑर्डर टाकावी. (उदा- 100/- रुपये खरेदी किंमत)

 

2- यानंतर आपली स्टॉप लॉसची ऑर्डर टाकावी. ही सेलिंग ऑर्डर असते (उदा- 95/- रुपये.) स्टॉप लॉस ऑर्डर टाकताना ट्रिगर प्राईज विचारली

जाईल. ट्रिगर प्राईज 95/- पेक्षा थोडीशी जास्त ठेवावी (उदा- 95.10/- रुपये) असे केल्यामुळे आपली स्टॉप लॉस ऑर्डर प्लेस होईल आणि समजा शेअर खाली पडु लागला तर 95.10/- ला आपली सेलिंग ऑर्डर ट्रिगर होऊन आपले शेअर्स 95/- रुपयांना विकले जातील.

3- टारगेट ऑर्डर लावुन ठेवली असल्यास स्टॉप लॉस झाल्यानंतर ती कॅन्सल करावी.


समजा तुम्ही इंट्राडे साठी स्टॉक शॉर्ट सेल करीत असाल तर-

 

1- पहिले आपली विक्रीची ऑर्डर टाकावी. (उदा- 100/- रुपये विक्री किंमत)

 

2- यानंतर आपली स्टॉप लॉसची ऑर्डर टाकावी. ही बायिंग ऑर्डर असते (उदा- 105/- रुपये.) स्टॉप लॉस ऑर्डर टाकताना ट्रिगर प्राईज विचारली जाईल. ट्रिगर प्राईज 105/- पेक्षा थोडीशी कमी ठेवावी (उदा- 104.90/- रुपये)

असे केल्यामुळे आपली स्टॉप लॉस ऑर्डर प्लेस होईल आणि समजा शेअर वर जाऊ लागला तर 104.90/- ला आपली बायिंग ऑर्डर ट्रिगर होऊन आपले शेअर्स 105/- रुपयांना खरेदी होतील.

 

3- टारगेट ऑर्डर लावुन ठेवली असल्यास स्टॉप लॉस झाल्यानंतर ती कॅन्सल करावी.


समजा तुम्ही पोझिशनल ट्रेडिंग (डिलिव्हरी) साठी स्टॉक खरेदी करीत असाल तर.

 

1- पहिले आपली खरेदीची ऑर्डर टाकावी. (उदा- 100/- रुपये खरेदी किंमत

 

2- पोझिशनल ट्रेडिंगमध्ये स्टॉप लॉस ऑर्डर लावुन ठेवता येत नाही. कारण रोजच्या ऑर्डर्स दररोज कॅन्सल होतात (अपवाद- काही ब्रोकर्स GTT सारखी फॅसिलिटी देतात, GTT ऑर्डर्स कॅन्सल न होता तश्याच राहतात.)

 

3- पोझिशनल ट्रेडिंग करताना शेअर्स घेतल्यानंतर दररोज संध्याकाळी शेअरचा भाव बघत राहणे आवश्यक आहे. ज्या दिवशी संध्याकाळी आपल्याला आपला स्टॉप लॉस क्रॉस झालेला दिसेल त्याच्या दुसर्‍या दिवशी मार्केट ओपन होताच मार्केट रेटला आपले शेअर्स विकुन टाकणे योग्य ठरते.

 

इक्विटी मार्केटमध्ये डिलिव्हरी बेस्ड ट्रेडिंग करताना शॉर्ट सेलिंग करता येत नाही त्यामुळे इथे स्टॉप लॉसचा प्रश्न उद्भवत नाही.

 

झिरोधामध्ये डीमॅट अकाऊंट उघडण्यासाठी येथे क्लिक करा

 

एडलवाईजमध्ये डीमॅट अकाऊंट उघडण्यासाठी येथे क्लिक करा

 

पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनमध्ये अ‍ॅडमिशन घेण्यासाठी येथे क्लिक करा

bottom of page