top of page

इंट्राडे सर्किट्स म्हणजे काय?

शेअर मार्केटमधील वाढलेली व्होलटॅलिटी रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी धोकादायक ठरु शकते.

समजा तुम्ही एखादा शेअर इंट्राडे ट्रेडिंगसाठी 100 रुपयांना खरेदी केला,

समजा या स्टॉकमध्ये अचानक निगेटिव्ह वातावरण निर्माण झाले आणि हा स्टॉक खाली पडु लागला,

 

तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.

 

हा स्टॉक एका मर्यादेपेक्षा खाली पडु नये म्हणुन त्याला "लोअर सर्किट" लावले जाते.

 

म्हणजेच एका विवक्षित लेव्हलच्या खाली हा स्टॉक त्या दिवशी येऊच शकत नाही अशी व्यवस्था केलेली असते.

 

हाच नियम इंट्राडे शॉर्ट सेलिंगसाठीदेखील लागु होतो.

 

समजा तुम्ही एखादा स्टॉक इंट्राडेसाठी शॉर्ट सेल केला, आणि त्या दिवसात किंमत खूप जास्त वाढली तरीदेखील तुमचे अमर्याद नुकसान होऊ शकते.

 

अश्या परिस्थितीमध्ये एका विवक्षित लेव्हलच्या वर हा स्टॉक त्या दिवशी येऊच शकत नाही अशी व्यवस्था केलेली असते.

 

याला "अप्पर सर्किट" असे म्हणतात.

 

सर्किट लेव्हल्स दररोज बदलत असतात.

 

अजुन एक महत्वाची माहिती

 

शेअर मार्केटमध्ये इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह्स (फ्युचर ऑप्शन्स) या दोन्हींचे ट्रेडिंग सुरु असते.

 

जे शेअर्स फक्त इक्विटीमध्ये आहेत त्यांना अप्पर आणि लोअर असे प्राईज बॅंड्स ठरवलेले असतात.

 

जे शेअर्स एफ अ‍ॅंड ओ मध्ये सुद्धा आहेत त्यांना सर्किट लिमिट्स ठरवलेले असतात.

 

प्राईज बॅंड आणि सर्किट लिमिट दोन्हींचे काम एकच असते.

 

परंतु जे शेअर्स किंवा इंडेक्स एफ अ‍ॅंड ओ मध्ये (डेरिव्हेटिव्ह्स) देखील आहेत त्यांना एक अतिरिक्त नियम घालुन दिलेला आहे.

 

डेरिव्हेटिव्ह्स वाल्या स्टॉक्सचे सर्किट लिमिट्स एका दिवसात बदलु शकतात.

 

समजा XYZ लिमिटेड चा शेअर काल 100 रुपयांना बंद झाला. (हा शेअर FnO मध्ये आहे असे गृहीत धरुयात)

 

तर आज मार्केट ओपन होताना आपल्याला सर्किट लिमिट्स 90 आणि 110 असे दिसतील.

 

आता इंट्राडेमध्ये समजा हा स्टॉक वर जाऊ लागला तर पहिल्यांदा 110 रुपयांवर याचे ट्रेडिंग 15 ते 45 मिनिटांसाठी बंद होईल.

 

15 ते 45 मिनिटांची वेळ संपली की या शेअरचे ट्रेडिंग पुन्हा सुरु होईल आणि आता सर्किट लिमिट 115 वर दिसु लागेल.

 

समजा हा शेअर अजुन वर वर जाऊ लागला तर 115 रुपयांवर पुन्हा एकदा त्याचे ट्रेडिंग 45 ते 75 मिनिटांसाठी बंद होईल.

 

45 ते 75 मिनिटांची वेळ संपली की या शेअरचे ट्रेडिंग पुन्हा सुरु होईल आणि आता सर्किट लिमिट 120 वर दिसु लागेल.

 

आता आजच्या दिवसात जर हा शेअर 120 रुपये झाला, तर मात्र दिवस संपेपर्यंत या शेअरमध्ये ट्रेडिंग करता येणार नाही.

 

थोडक्यात 10%, 15% आणि 20% असे सर्किट लिमिट वाढवले जाईल.

 

हीच गोष्ट खालच्या साईडलासुद्धा लागु होते.

 

म्हणजेच शेअर जर खाली पडु लागला तर 90 रुपयांना ट्रेडिंग हॉल्ट केले जाईल (वेळ 15 ते 45 मिनिटे)

 

त्यानंतर ट्रेडिंग सुरु होईल आणि आता सर्किट लिमिट 85 रुपये दिसेल. 85 मिनिटांवर किंमत पुन्हा हॉल्ट होईल (वेळ 45 ते 75 मिनिटे)

 

आणि मग पुन्हा शेवटचे सर्किट 80 रुपयांवर लावले जाईल आणि मग ते दिवसभर कायम राहील.

 

समजा FnO च्या स्टॉकने कोणत्याही सर्किट लिमिटला टच केले तर ट्रेडिंग बंद केले जाते

 

किती वेळासाठी ट्रेडिंग बंद होईल हे स्टॉक किती वाढला किंवा घटला यावर अवलंबुन असते.

 

जितकी मोठी प्राईज मूव्हमेंट तितका जास्त वेळ ट्रेडिंग बंद ठेवले जाते.

 

सेबीने 10%, 15% आणि 20% अशी लिमिट्स ठरवलेली आहेत.

 

जर 10% मूव्हमेंट झाली गेली तर ट्रेडिंग आत्ता किती वाजले आहेत त्या वेळेनुसार 15-45 मिनिटांच्या दरम्यान थांबविले जाते.

 

जर 15% मूव्हमेंट झाली तर ट्रेडिंग आत्ता किती वाजले आहेत त्या वेळेनुसार 45-75 मिनिटांच्या दरम्यान थांबविले जाते.

 

जर 20% मूव्हमेंट झाली तर ट्रेडिंग पूर्ण दिवस थांबवले जाऊ शकते.

 

सर्किट लिमिट जर दुपारी 1 वाजण्याच्या आधी गाठले गेले तर ट्रेडिंग जास्त काळासाठी थांबवतात.

 

आणि जर सर्किट लिमिट शेवटच्या सत्रामध्ये म्हणजेच दुपारी 2:30 नंतर गाठले गेले तर ट्रेडिंग कमी काळासाठी बंद ठेवतात किंवा हॉल्ट न करता चालुच ठेवु शकतात.

 

ट्रेडिंग बंद व चालु करण्याचा निर्णय स्टॉक एक्स्चेंजद्वारे घेतला जातो


हे सर्व समजण्यास कठीण वाटत असेल तर काळजी करु नका. तुमच्या ब्रोकरच्या टर्मिनलवर प्रत्येक शेअरचे रोजचे प्राईज बॅंड्स किंवा सर्किट लिमिट्स अपडेट होत असतात.


आपण इंट्राडेसाठी निवडत असलेल्या स्टॉकच्या आजच्या सर्किट लेव्हल्स कोणत्या हे कसे बघावे.

झीरोधा मोबाईल

photo_2021-06-16_21-46-39.jpg

एडलवाईज मोबाईल

photo_2021-06-16_21-47-50.jpg

झीरोधा पीसी

Kite PC.png

एडलवाईज पीसी

Edelweiss PC.png

​कोणताही इंट्राडे ट्रेड घेताना शेअरचे त्या दिवशीचे प्राईज बॅंड्स किंवा सर्किट लिमिट्स आवर्जुन बघावेत जेणेकरुन आपल्याला अडकुन रहावे लागणार नाही.

 

 

काही स्टॉक्स सलग काही दिवस सर्किट मध्ये जातात. अश्या स्टॉक्समध्ये समजा आपली पोझिशन आपल्याला सोडवता आली नाही आणि आपल्या विरुद्ध दिशेने किंमत जात असेल तर आपले मोठे नुकसान होऊ शकते.

 

 

 

त्यामुळे ट्रेड घेताना ही काळजी आवर्जुन घ्यावी.

bottom of page